मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी यान उतरले

August 6, 2012 10:49 AM0 commentsViews: 4

06 ऑगस्ट

मंगळावरील संभाव्य जीवसृष्टी आहे का ? या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळणार आहे. कारण याच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी नासाने पाठवलेलं क्य्ुारिऑसिटी हे यान भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता मंगळावर उतरलंय. साडे आठ महिन्यांचा प्रवास करून क्युरिऑसिटी मंगळावर पोचलं. आतापर्यंत मंगळावर उतरणारं हे सगळ्यांत मोठं आणि जड यान आहे. पुढची दोन वर्ष मंगळावर राहून हे यान अनेक गोष्टींचा शोध घेणार आहे. पोहोचल्या पोहोचल्या या यानाने मंगळाच्या पृष्ठभागावरून 2 छायाचित्रंही पाठवली आहे. अतिशय धाडसी असलेल्या ह्या प्रयोगाचे थेट प्रक्षेपण नासाच्या वेबसाइटवर केलं जातंय. यापुर्वीच्या नासाच्या यानांनी मंगळावर बर्फ आणि पाण्याचा अंश असल्याचा शोध लावला होता.

close