सायनाची लढाई आज ब्राँझ मेडलसाठी

August 4, 2012 11:39 AM0 commentsViews: 6

04 ऑगस्ट

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ब्राँझ मेडल पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे. तिची गाठ आहे ती चिन्चाय झिंग वँगशी..सेमीफायनलमध्ये चीनची नंबर वन बॅडमिंटनपटू वँग यिहाननं सायनाचा पराभव केला होता. त्यामुळे सायनाला आता ब्राँझ मेडलसाठी खेळावं लागणार आहे. ऑलिम्पिक इतिहासात सेमीफायनलमध्ये पोहचणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. त्यामुळे सेमीफायनलमध्ये तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण वँग यिहानच्या आक्रमक खेळासमोर सायनाचा निभाव लागला नाही. 21-13 आणि 21-13 असा सरळ सेटमध्ये तिला पराभव पत्करावा लागला.

भारतीय खेळाडूंसमोर कोणती आव्हान

बॅडमिंटनमध्ये भारतासाठी महत्वाचा दिवस असणार आहे. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आज ब्राँझ मेडलसाठी खेळेल. तिच्यासमोर आव्हान आहे ते चीनच्या झिंग वँगचं. शुटिंगमध्ये ट्रॅप प्रकारात शगुन चौधरी नेमबाजीतीलं तिसरं मेडल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. बॉक्सिंगमध्ये 49 किलो वजनी गटात देवेंद्रो सिंग राउंड 16मध्ये खेळेल… त्याच्यासमोर आव्हान असेल ते मंगोलियाच्या सेरदेम्बाचं.

close