उसेन बोल्ट ‘फास्टेस्ट मॅन’

August 6, 2012 11:16 AM0 commentsViews: 3

06 ऑगस्ट

तो आला…त्यांनी पाहिलं…तो पळाला आणि तो जिंकला असंच काहीस उसेन बोल्टनं सोबत घडलं. बोल्टने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर रेसमध्ये गोल्ड पटकावण्याचा त्यानं पराक्रम केला आहे. काल झालेल्या 100 मीटर फायनलमध्ये बोल्टनं 9.63 सेकंद वेळ नोंदवत गोल्ड पटकावलं. फायनलची लाईन अप ही चॅम्पियन ऍथलीट्सनं भरलेली होती. उसेन बोल्टला आव्हान होतं ते योहान ब्लेक, जस्टीन गॅटलीन, टायसन गे आणि असाफा पॉवेल यांचं. पण आपणचं जगातील सर्वोत्तम ऍथलिट असल्याचं बोल्टनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. 9.87 सेकंदांची वेळ नोंदवत बोल्टने फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण फायनलमध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी करत बीजिंग ऑलिम्पिकचा रेकॉर्ड मोडला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टनं 9.69 सेकंदांची वेळ नोंदवत गोल्ड पटकावलं होतं. पण यावेळी त्याने तो रेकॉर्डही मोडला. जमैकाच्याच योहान ब्लेकनं 9.75 सेकंदांची वेळ नोंदवत सिल्व्हर पटकावलं तर 9.79 सेकंदांची वेळ नोंदवत अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीननं ब्राँझ पटकावलंय. ऑलिम्पिकच्या इतिहासात ही सर्वात फास्ट 100 मीटरची रेस झाली.

close