केशुभाई पटेल यांचा भाजपला रामराम

August 4, 2012 12:24 PM0 commentsViews: 2

04 ऑगस्ट

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे दिला आहे. पटेल यांच्यासोबत काशीराम राणा यांनीही राजीनामा दिला आहे. आपण सत्तेसाठी पक्ष सोडत नाही आहोत, काही उद्दिष्ट साध्य करायचे आहे म्हणून राजीनामा दिला आहे. गुजरातच्या जनतेला भाजपच्या तावडीतून सुटका हवी आहे. यासाठी आम्ही उद्या नव्या पक्षाची घोषणा करणार आहोत असं पटेल यांनी जाहीर केलं. येत्या ऑक्टोबर महिन्यात गुजरात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

close