पवारांनी आबांना फटकारले; गृहखाते करतेय काय?

August 4, 2012 12:43 PM0 commentsViews: 4

03 ऑगस्ट

वारंवार स्फोट होतात निष्पाप लोकांचा बळी जातो. स्फोट होणं योग्य नाही, बुधवारी पुण्यात स्फोट झाले. एवढं सगळं होऊन सुध्दा प्रशासन काहीच करत नाही. पोलीस,गृहखाते नेमकं काय करत आहे असा सवाल विचारत गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे नाव घेता अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी टीका केली. तसेच गृहखात्यातील प्रशासनात बदल करावी लागतील असा सल्लाही पवारांनी दिला.

पुणे स्फोटांनंतर आता उणीदुणी काढायला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रवादीचा मेळाव्यात सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे स्फोटांप्रकरणी गृहखात्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दिल्ली,मुंबई नंतर पुण्यासारख्या सांस्कृतिक शहर आता अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आले आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतर बुधवारी पुण्यात कमी तीव्रतेचे स्फोट झाले. ही बाब चिंताजणक आहे. मात्र मागिल घटनातून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही. निष्पाप लोकांचा नाहक बळी जातोय. एवढं होऊन सुध्दा गृहखाते काय करत आहे ? ज्या अधिकार्‍यांनी बेजाबदारपणा दाखवला आहे त्यांना त्यांची जाग दाखवावी लागेल. आता या घटनातून प्रशासनाने योग्य धडा घ्यावा आणि प्रशासनात बदल करणे गरजेच आहे असं सांगत पवारांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पवारांनी आपली नाराजी व्यक्त करत गृहखात्यात बदलाचे शब्द उद्गारले. त्यामुळे आबांचे गृहखाते जाते की काय अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

close