देवकरांचा जामीन अर्ज रद्द, अटकेची शक्यता

August 6, 2012 12:53 PM0 commentsViews: 1

06 ऑगस्ट

जळगाव घरकुल घोटाळ्या प्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं गुलाबराव देवकर यांचा जामीन रद्द केला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या निर्णयाविरोधात देवकर सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देवकर यांचा राजीनामा मागितला आहे.

घरकुल घोटाळा

जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या गुलाबराव देवकर यांच्याविरोधात 29 कोटीच्या घरकुल घोटाळयाची तक्रार 2006 ला तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी 92 संशयितांविरुध्द दाखल केली होती. 4 महिन्यापूर्वी अप्पर पोलीस अधिक्षक ईशु सिंधु यांनी तपास सुरु केल्यानंतर आत्तापर्यंत 30 संशयितांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली होती. आमदार सुरेशदादा जैन यासह 17 जणांची जामीनावर सुटका झाली असून 13 संशयित कारागृहात आहे. हा घोटाळा झाला त्या कालावधीत गुलाबराव देवकर हे जळगाव नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष होते.

close