भरदिवसा 27 दिवसांच्या चिमुकलीला पळवले

August 4, 2012 12:58 PM0 commentsViews: 1

04 ऑगस्ट

भरदुपारी हॉस्पिटलच्या परिसरातून 27 दिवसांची चिमुकली मातेच्या हातातून घेऊन पसारा झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मुस्कान शेख ही महिला आपल्या 27 दिवसांच्या चिमुकलीला उपचाराकरिता पुण्यातल्या केईएम रूग्णालयात घेऊन आली होती. मात्र तिथे आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी रूग्णालयाच्या बाहेरून मुस्कान शेख यांच्या मुलीला हातातून खेचून आरडाओरडा करण्याआधीच ते तिथून पसार झाले. लागलीच मुस्काननं जवळचं समर्थ पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या चिमुकलीला अज्ञातांनी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलीस या चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. किडनॅपर्सच्या संदर्भात अजूनही पोलिसांच्या हाती काही माहिती लागली नाही.

close