फुलराणी सायना ब्राँझ मेडलची मानकरी

August 4, 2012 1:14 PM0 commentsViews: 5

04 ऑगस्ट

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आज महिला एकेरीचं ब्राँझ मेडल पटकालं आहे. ब्राँझ मेडलसाठी तिची गाठ होती चीनच्या झिंग वँगशी… पहिला सेट झिंग वँगनं 21-18 असा जिंकला. पण मॅच दरम्यान वँगच्या पायाला दुखापत झाली. आणि यानंतर तिनं मॅचमधून माघार घेतली. वँगनं माघार घेतल्यानं सायना नेहवालला विजयी घोषित करण्यात आलं. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतानं बँडमिंटनमध्ये पटकावलेलं हे पहिलं मेडल ठरलंय. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने आता तीन मेडल पटकावली आहे. यात 1 सिल्व्हर आणि दोन ब्राँझ मेडलचा समावेश आहे.

close