‘सुपरमॉम’ मेरीकोम सेमीफायनलमध्ये

August 6, 2012 1:48 PM0 commentsViews: 3

06 ऑगस्ट

भारताची सुपरमॉम बॉक्सर मेरीकोमनं इतिहास रचला आहे. महिलांच्या 51 किलो वजनी गटात मेरी कॉमनं सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टर फायनलमध्ये तीनं टुनिशियाच्या राहाली मारोयुचा 15-6 असा धुव्वा उडवला मॅचच्या सुरुवातीपासूनच मेरी कॉमनं वर्चस्व राखलं. काल रविवारी मेरीकॉमनं पोलंडच्या कॅरोलिनाचा 19-14 असा धुव्वा उडवला होता. मेरीकॉम पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलीय आणि आता तिचं ऑलिम्पिक मेडलही निश्चित झालंय. ऑलिम्पिकमध्ये यंदा पहिल्यांदाच महिला बॉक्सिंगचा समावेश झाला आहे. आणि या पहिल्या स्पर्धेत पहिल्या गोल्ड मेडलसाठी मेरी कॉम सज्ज झाली आहे.

close