सेरेनाने गोल्ड मेडल पटकावले

August 4, 2012 2:50 PM0 commentsViews: 2

04 ऑगस्ट

टेनिसमध्ये अमेरिकेनं गोल्ड मेडलची नोंद केली आहे. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने महिला एकेरीत विजयाची नोंद केली आहे. फायनलमध्ये तिच्यासमोर आव्हान होतं ते रशियाच्या मारिया शारापोव्हाचं… फायनल मॅच चुरशीची होईल असं वाटत होतं. पण सेरेनानं ही मॅच एकतर्फी जिंकली. पहिला सेट तीनं 6-0 असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्येही सेरेनाचंच वर्चस्व राहिलं. शारापोव्हाला केवळ 1 गेम जिंकता आला. दुसर्‍या सेटमध्ये सेरेनानं 6-1 अशी मात करत गोल्ड मेडल पटकावलं.

close