केशुभाईंचा गुजरात परिवर्तन पक्ष स्थापन

August 6, 2012 2:34 PM0 commentsViews: 2

06 ऑगस्ट

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. गुजरात परिवर्तन पक्ष असं या पक्षाचं नाव आहे. केशुभाई यांनी गेल्या शनिवारी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या दडपशाहीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं पटेल यांनी सांगितलं. येत्या ऑक्टोबर महिन्यात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केशुभाई पटेल आणि सर्व मोदी विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे.

close