चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुढे ढकलली

November 27, 2008 1:49 PM0 commentsViews: 3

27 नोव्हेंबर मुंबईमुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. स्पर्धेच्या नव्या तारखा काही दिवसांनी जाहीर करण्यात येतील.तर स्पर्धेची ठिकाणंही बदलण्याची शक्यता आहे. मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकण्यात आली आहे.स्पर्धेच्या नव्या तारखा ठरवण्यासाठी पुढच्या महिन्यात चँपियन्स लीगचे अधिकारी भेटणार आहेत. बीसीसीआयच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या टीमस् भारतात दाखल होणार होत्या. पण कालच्या हल्ल्यानंतर त्यांनी भारतात येणं पुढे ढकललं. मुंबईतल्या ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. याच हॉटेलमध्ये स्पर्धेतल्या जवळ जवळ सगळ्याच टीमस् रहाणार होत्या.राजस्थान रॉयल्स टीमचा कॅप्टन शेन वॉर्न आधीच मुंबईत यायचा होता. पण सिंगापूरमध्ये असताना त्याला हल्ल्याची बातमी मिळाली आणि त्याने लगेचच मुंबईत न येण्याचा निर्णय घेतला. सध्या तो सिंगापूरमध्येच थांबला आहे. चॅम्पियन्स लीगचे बारा अधिकारीही ताज हॉटेलमध्येच उतरले होते. पण या हल्ल्यातून ते वाचले आहेत.

close