स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी रामराव गाडेकर निलंबित

August 4, 2012 3:00 PM0 commentsViews: 7

04 ऑगस्ट

बीडमधल्या परळी स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी रामराव गाडेकर यांना अखेर निलंबित करण्यात आलंय. गाडेकर यांनी डॉ. सुदाम मुंडे याच्याविरूध्द कलमं लावताना मुद्दाम अजामिनपात्र गुन्ह्यांची कलमं लावली होती, असे ताशेरे अंबाजोगाई कोर्टाने मारलं होते. त्यामुळे गाडेकर अडचणीत आले होते. विविध संघटनांनी त्याविरूध्द आवाज उठवला होता. त्यानंतर गाडेकर यांची चौकशी करण्यासाठी खात्यांतर्गत चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल दिलाय. त्यात गाडेकर यांनी कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर ही निलंबणाची कारवाई करण्यात आली. आयबीएन लोकमतने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.

close