राष्ट्रपतींच्या विरोधात संगमा सुप्रीम कोर्टात जाणार

August 4, 2012 3:23 PM0 commentsViews: 1

04 ऑगस्ट

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दारूण पराभव पत्कारणारे एनडीएचे उमेदवार पी.ए.संगमा यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निवडणुकीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. संगमा आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक लढवली त्यावेळी त्यांच्याकडे लाभाची पदं होती असा दावा संगमांनी केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयासाठी 5 लाख 49 हजार 422 मतांची गरज होती. प्रणव मुखर्जी यांना 527 मतं मिळाली ज्याचे मुल्य 7,14,763 इतके होते. तर संगमांना 3,15,987 मतं मिळाली होती.

close