‘गोविंदा’ येतोय…

August 6, 2012 3:31 PM0 commentsViews: 3

06 ऑगस्ट

'गोविंदा आला रे…आला..जरा मटकी सांभाल…' गाण्यावर बेधुंद होऊन पण आपला तोल सांभाळून गोविंदा आता 'मटकी' फोडण्यासाठी सज्ज होतं आहे. मुंबईमध्ये जवळपास सव्वा तीनशे गोविंदा पथके लाखो रुपयांची दहीहंडीची बक्षीसं मिळवण्यासाठी कसून तयारीला लागली आहे. माझगाव ताडवाडी मंडळ आणि जय जवान मंडळ यांच्यामध्ये याही वर्षी चुरस दिसतेय. स्पेनच्या कॅसलर्सचा विक्रम मोडण्यासाठी मंडळ जोमाने सराव करत आहे. यंदाच्या वर्षी दहा थरांचा विक्रम करता यावा यासाठी ही मंडळ प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई मधल्या अनेक ठिकाणी रात्री कामावरुन आल्यानंतर तरुण मंडळी गोविंदाच्या सरावात मग्न झाली आहे…तर दुसरीकडे मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या दहीहंडी उत्सवाला दरवर्षीप्रमाणे सेलिब्रेटी मंडळी हजेरी लावणार आहे. त्यामुळे काही दिवस धीर धरा गोविंदा लवकरच येतोय…

close