ब्लॉगमधल्या मतावर अडवाणी ठाम

August 6, 2012 10:07 AM0 commentsViews: 1

06 ऑगस्ट

ब्लॉगमधल्या आपल्या मतावर आपण ठाम असल्याचं भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्ट केलं आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर देशात तिसर्‍या आघाडीचा पंतप्रधान असेल आणि त्याला काँग्रेस किंवा भाजप या दोन प्रमुख पक्षांपैकी एकाचा पाठिंबा असेल, असं भाकीत अडवाणींनी ब्लॉगवरुन केलं होतं. तसेच यासाठी त्यांनी देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि विश्वनाथ प्रताप सिंग या काँग्रेस आणि भाजपने पाठिंबा दिलेल्या पंतप्रधानांचा दाखला दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात यावरुन चर्चेला उधाण आलं होतं.

close