लालकृष्ण अडवाणींच्या ब्लॉगवर बाळासाहेबांची टीका

August 7, 2012 10:50 AM0 commentsViews: 1

7 ऑगस्ट, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींवर टीका केली आहे. लालकृष्ण अडवाणींनी आपल्या ब्लॉगमधून 2014 च्या निवडणूकीनंतर गैरभाजपाचा किंवा गैरकाँग्रेसी पक्षाचा पंतप्रधान होऊ शकतो अशी भूमिका मांडली होती. सध्या देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा असून त्या अस्थिरतेतून दिशा दाखवणाचे कार्य राष्ट्रीय लोकशाही आघाडीला करायचे आहे असं बाळासाहेबांनी अग्रलेखात लिहिलं आहे. भाजपला नक्की काय झालंय? त्याला एखादा आजार जडला आहे की तो अंतर्कलहाने बेजार झालाय.? भाजपचा अंतर्गत प्रश्न समजून या प्रश्नाकडे चालणार नसून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या भविष्याचा आणि दिल्लीतील सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर लालकृष्ण अडवाणींनी आपल्या ब्लॉगमुळे भाजपलाच पेचात टाकलं असल्याचंही बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलंय.

close