मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत – मुख्यमंत्री

November 27, 2008 3:06 PM0 commentsViews: 3

27 नोव्हेंबर, मुंबई मुंबईत झालेल्या दहशतवाद्यांच्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखाची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली. 'आम्हाला विशेष प्रशिक्षण प्राप्त कंमाडोजची गरज आहे. तपासपूर्ण झाल्यावरच अतिरेक्यांबाबत पूर्ण माहिती मिळेल. विधिमंडळ अधिवेशन पुढे ढकलण्याची सूचना पोलिसानी केली होती. मात्र अधिवेशन वेळेतच सुरू होईल ', असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. एटीएसच्या प्रमुख पदाचा तात्पुरता चार्ज के.पी. रघुवंशी यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

close