अमेरिकेत गुरुद्वारामध्ये गोळीबार, 6 जण ठार

August 6, 2012 10:29 AM0 commentsViews: 4

06 ऑगस्ट

अमेरिकेत विस्कॉन्सिन येथील गुरुद्वारात रविवारी सकाळी एका माथेफिरूने बेछून गोळीबार केला. यात 6 जण ठार झाले आहेत. तर 20 जण जखमी झालेत. त्यातल्या तिघांची अवस्था गंभीर आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. हातात दोन हँडगन घेऊन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं हा गोळीबार केला. गोळीबार करणार्‍याच्या मनगटावर 9/11चं टॅटू होतं. त्याला मारण्यात पोलिसांना यश आलंय. एफबीआय (FBI) याचा तपास करतंय. हा दहशतवादी कट आहे, याचा तपासही FBI करतंय. अमेरीकेतील इंडियन कॉन्सुलेट या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.

close