विलासराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक

August 7, 2012 4:23 PM0 commentsViews: 65

07 ऑगस्ट

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक आहे. विलासरावांचे यकृत निकामी झालंय. यकृत प्रत्यारोपणासाठी त्यांना चेन्नईतल्या प्रसिध्द ग्लोबल हॉस्पिटलमध्ये काल दाखल करण्यात आलं. पण श्वासोच्छ्वास, ब्लड प्रेशर अस्थिर असल्यामुळे शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. तब्येत खालावल्यामुळे विलासरावांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं आहे. गेल्या एका वर्षापासून त्यांच्या यकृताच्या आजारावर इलाज सुरू आहे. गेल्या आठवड्यात त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. पण काल सोमवारी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने चेन्नईला हलवण्यात आलं. देशमुख कुटुंबीय सोबत आहे. आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे विलासरावांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी चेन्नईला गेले आहे.

दरम्यान, विलासराव देशमुखांच्या खात्यांची जबाबदारी वायलर रवी यांच्याकडे देण्यात आली आहे. विलासरावांकडे असलेल्या लघू उद्योग खात्याची जबाबदारी रवींकडे देण्यात आली आहे. वायलर यांच्याकडे सध्या अप्रवासी भारतीय विभागाचे मंत्री आहेत. विलासरावांची तब्येत बिघडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येतं आहे.

लिव्हर सिरॉसिस म्हणजे काय ?

- लिव्हर सिरॉसिसमुळे यकृत निकामी होतं- सिरॉसिसमुळे यकृतात गाठी तयार होतात- यकृताचा आकार लहान होतो- यकृताची क्रियाशक्ती मंदावते- सिरॉसिसमुळे पचनाला अडथळे- सिरॉसिस 'हिपेटायटीस बी'च्या संसर्गामुळे होते- सिरॉसिसवर सुरुवातीच्या काळात उपचार गरजेचे- वेळेवर उपचार न झाल्यास लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय पर्याय नाही- लिव्हर ट्रान्सप्लांट जवळच्या नातेवाईकांकडून किंवा अवयवदान प्रक्रियेतून करता येते

close