पुण्यात रस्त्यावर दहीहंडी उत्सवाला बंदी

August 8, 2012 10:42 AM0 commentsViews: 17

08 ऑगस्ट

पुण्यात 1 ऑगस्ट रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता संपूर्ण शहरात सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवातही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. शहरात यावेळी मुख्य रस्त्यांवर दहीहंडी, उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्याऐवजी मोकळ्या मैदानांवर दहीहंडी साजरी केली जावी असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. दहीहंडी उत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे असल्यामुळे दहीहंडीवर बॉम्बस्फोटांचं सावट असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली. यामुळेच सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून यंदा दहीहंडी 10 च्या आत संपवावी तसेच जास्त गर्दी करु नये, अशा सूचना पोलिसांतर्फे देण्यात आल्या आहेत. मोठ्या दहीहंडी पथकांपाशी बीडीडीएसच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

close