डॉ.आंबेडकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

August 8, 2012 7:52 AM0 commentsViews: 2

08 ऑगस्ट

पुण्यातील खडकी छावणीतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी आणि कर्मचार्‍यांनी आजपासून हॉस्पिटल बंद करून आंदोलन सुरु केलं आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. सूर्यकांत कांबळेंना मृत मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केली होती. याचाच निषेध करत हॉस्पिटलमधील डॉकटर आणि कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. मारहाण करणार्‍या आरोपीला ताबडतोब अटक करा आणि डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना कायम स्वरूपी सुरक्षा पुरवावी अशी मागणी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी केली आहे.

close