पुण्यात सायकल खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

August 7, 2012 12:58 PM0 commentsViews: 1

07 ऑगस्ट

पुण्यामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा तपास करण्यासाठी आता शहरातील सगळ्या लॉजची तपासणी पोलीस करत आहे. त्याचबरोबर सुरक्षेचे उपायही केले जात आहे. या स्फोटांमध्ये झालेला सायकलींचा वापर लक्षात घेऊन आता सायकल विकत घेण्यासाठी फोटो आयडेंटीफिकेशन प्रुफ देणं बंधनकारक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. सायकल विक्रेत्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सायकलच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत अशा सूचनाही पोलिसांनीदिल्या आहे. लहान मुलांसाठी सायकल विकत घेतली जात असेल तर पालकांचं फोटोआयडी घेतलं जाईल.

close