ताजमधील 5 अतिरेकी ठार

November 27, 2008 3:21 PM0 commentsViews: 2

27 नोव्हेंबर, मुंबई ताज हॉटेलमधील ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आलं आहे. हॉटेलमध्ये घुसलेल्या पाच अतिरेक्यांना एनएसजी कमांडोंनी ठार केलंय. तरीही पूर्ण हॉटेलची कसून छाननी केल्याशिवाय या ऑपरेशनची माहिती देण्यात येणार नाही, असं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलंय. संध्याकाळी पावणेसातच्या सुमाराला रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सनं ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि 15 लोकांची सुटका केली. पण अतिरेक्यांनी ताजचे महाव्यवस्थापक करमवीर यांच्या पत्नी आणि तीन मुलांची हत्या केलीय.

close