विद्यार्थ्यांनीला वर्गात कपडे उतरवण्याची शिक्षा

August 8, 2012 11:12 AM0 commentsViews: 9

08 ऑगस्ट

विद्यार्थ्यांच्या चुका झाल्यावर शिक्षा करणे हा शिक्षकांचा रोजचा भाग. पण या शिक्षकांनी शिक्षेच्या आड विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार केल्याच्या घडना वारंवार घडत आहे. पुण्यातील सेंट ऍन्ड्रयूज हायस्कूल फॉर गर्ल्स शाळेत नीता बोर्डे या शिक्षिकेने एका विद्यार्थ्यांनीला भर वर्गात कपडे उतरवून उभे राहण्याची शिक्षा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आपल्या मॅडमने अशी शिक्षका केल्यामुळे पीडित विद्याथीर्ंनीने आपल्या आई-वडीलांना याबद्दल सांगितलं. आपल्या पाल्यासोबत झालेल्या प्रकार ऐकून त्याना एकच धक्का बसला. थेट नजीकचे बंड गार्डन पोलीस स्टेशन गाठून सदरील शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून शिक्षिका नीता बोर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पालकांचा राग एवढ्यावर थांबला नाही त्यांनी आपल्या मुलीचा दाखलासुध्दा या शाळेतून काढून घेतला आहे.

close