उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान, 50 पर्यटक अडकले

August 7, 2012 7:30 AM0 commentsViews: 1

07 ऑगस्ट

उत्तराखंडमध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू आहे. उत्तरकाशीमध्ये भटवारी आणि सुकीटोप दरम्यान एक पूल कोसळल्याने 50 पर्यटक अडकले आहे. त्यांच्याशी संपर्क साधणं आणि अत्यावश्यक वस्तू पोचवणं कठीण बनलंय. त्यांची कोणतीही माहिती नसल्याचे तिथल्या स्थानिक प्रशासनाने सांगितलंय. या पावसात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 70 गावांचा संपर्क तुटला आहे. 20 हजार लोकांना पावसाचा फटका बसलाय. तर चारधाम यात्रेवर असलेले 3 हजार यात्रेकरू अजून ठिकठिकाणी अडकलेत.

close