बाबा रामदेव यांच्या रॅलीत अण्णा राहणार गैरहजर

August 8, 2012 12:26 PM0 commentsViews:

08 ऑगस्ट

योगगुरू बाबा रामदेव काळ्यापैशाविरोधात उद्यापासून पुन्हा नवा लढा सुरू करत आहेत. पण दिल्लीतल्या रामलीला मैदानावर होणार्‍या या रॅलीत अण्णा हजारे जाणार नाही अशी माहिती मिळतेय. बाबा रामदेव यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याने अण्णा हजारे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. रामदेव यांनी काल स्वत: अण्णांशी बोलून त्यांना आंदोलनात येण्यासाठी निमंत्रण दिल्याचंही कळतंय. पण असं कुठलंच निमंत्रण मिळालं नसल्याचं अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे अण्णांनी बाबा रामदेव यांच्या रॅलीत सहभागी व्हावं अशी विनंती किरण बेदी यांनी केली आहे.

close