आयपीएस अधिकारी मारिया फर्नांडीस पुन्हा वादात

August 7, 2012 3:15 PM0 commentsViews: 6

07 ऑगस्ट

वादग्रस्त आयपीएस अधिकारी मारिया फर्नांडीस पुन्हा एकदा वादात सापडली आहे. कोणतीही पुर्वसुचना न देता त्या सात वर्ष सेवेत नव्हत्या. त्यानंतर पुन्हा रुजु झाल्या. डोंबिवलीच्या सागाव भागात पिंपळेश्वर महादेव मंदिराची जागा मारिया यांनी जबरदस्तीने बळकावली आहे असा आरोप मंदिराच्या विश्वस्तांनी केलाय. मंदिराची जागा ही 1961 साली मारिया फर्नांडीस यांच्या वडिलांनी मंदिराला दान केली. आणि आता पुन्हा 40 वर्षांनंतर ती जमीन मारिया फर्नांडीस पुन्हा मागतेय. या जागोविषयी कल्याण कोर्टात केस सुरु आहे. जर फर्नांडीस यांनी जागा सोडली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा भाजपनं दिला आहे.

close