पुणे स्फोट प्रकरणी दयानंद पाटीलला डिस्चार्ज

August 7, 2012 3:22 PM0 commentsViews: 1

07 ऑगस्ट

पुणे स्फोट प्रकरणातील जखमी दयानंद पाटीलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. स्फोटानंतर दयानंद पाटीलला ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. पण स्फोटामधला संशयित आरोपी म्हणूनही पोलीस त्याची आणि त्याच्या कुटंुबीयांची चौकशी करत आहे. दयानंद पाटीलला ससून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असला तरी पोलिसांनी त्याला त्याच्या कर्नाटाकतल्या मूळ गावी बिदरला नेलं असल्याची शक्यता आहे. स्फोटांच्या दिवशी स्फोटक असलेली पिशवी दयानंद सायकलीवरुन घेऊन जात असताना स्फोट झाला यात तो जखमी झाला. या स्फोटानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दयानंद निर्दोष असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.

close