पुण्यात दहीहंडी उत्सवावर बॉम्बस्फोटाचं सावट

August 7, 2012 3:31 PM0 commentsViews: 2

07 ऑगस्ट

दहीहंडी उत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे पण मागिल आठवड्यात झालेल्या पुणे स्फोटांमुळे यंदाच्या दहीहंडीवर बॉम्बस्फोटांचं सावट असणार आहे . यामुळेच सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून यंदा दहीहंडी 10 च्या आत संपवावी तसेच जास्त गर्दी करु नये, अशा सूचना पोलिसांतर्फे देण्यात आल्या आहेत. मोठ्या दहीहंडी पथकांपाशी बीडीडीएसच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर पोलrस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. मागिल आठवड्यात जंगली महाराज रोडवर कमी तीव्रतेचे चार स्फोट झाल्यामुळे शहर हादरुन गेले. कमी तीव्रतेचे स्फोट असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली नाही. मात्र तपासनंतर पावसामुळे स्फोटकांची तीव्रता कमी झाल्याचे पुढे आले होते. यामुळे खबरदारी घेत दहीहंडी उत्सवासाठी 'हाय अलर्ट जारी' केला आहे.

close