दहीहंडीला हवा खेळाचा दर्जा !

August 8, 2012 3:10 PM0 commentsViews: 1

08 ऑगस्ट

दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळावा यासाठी गेले कित्येक वर्ष गोविंदा पथक मागणी करत आहे. याबाबत आयोजकांनीही अनेकदा आवाज उठवला. मात्र अद्यापही दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळु शकलेला नाही. याच विषयाला आयबीएन लोकमतने आवाज दिला आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळवण्यासाठी आयोजकांनी आपलं दबावगट बनवण्याबरोबरच क्रीडा विभागाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. जर गोविंदानं खेळाचा दर्जा मिळू शकला तर सरकारी नोकरीमध्ये खेळाच्या आरक्षणाचा फायदा ज्या प्रमाणे इतर खेळांडूना मिळतो त्या प्रमाणे गोविंदानाही मिळू शकेल त्याच बरोबर 100 टक्के विमा संरक्षण आणि सोयीसुविधा गोविंदांना मिळतील. महिला गोविंदा सुद्धा या मागणीचा पाठपुरावा करत आहेत.

close