ओलिसांच्या बचावाचं एटीएसला प्रशिक्षण नाही

November 27, 2008 3:34 PM0 commentsViews: 3

27 नोव्हेंबर, दिल्लीमुंबईततील या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्तानं एक गोष्ट विशेषकरुन समोर आलीय. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील एटीएस पथकांना ओलिसांच्या बचावकार्याचं कुठलंही प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही. एनएसजी, मार्को आणि लष्कराकडेच अशा कारवाईची क्षमता आहे. म्हणूनच अतिरेक्यांच्या तावडीत सापडलेल्या मुंबईची सूत्रं एनएसजी आणि लष्कराकडं देण्यात आलीयत. अनेक पोलिसांच्या मृत्यूचा धक्का बसल्यानंच एनएसजी आणि मार्कोंना या कारवाईचा तपशील द्यायला पोलीस आणि एटीएसकडून उशीर झाला. अतिरेकी शस्त्रसज्ज आणि प्रशिक्षित असल्यानं तसंच त्यांनी लोकांना ओलीस ठेवल्यानं पोलीस कमांडोनांही हॉटेलात घुसून कारवाई करणं शक्य झालं नाही. त्यामुळेच एनएसजीचं पथक येईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी सगळ्या सुरक्षा यंत्रणांची बैठक झाली. आणि संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनएसजी आणि मार्कोंना हॉटेलात घुसणं सोपं व्हावं, याची जबाबदारी लष्करानं घेतली आणि या सर्व कारवाईला एटीएस आणि पोलीस मदत करत आहेत.

close