विजय कुमारचं जल्लोषात स्वागत

August 8, 2012 3:16 PM0 commentsViews: 3

08 ऑगस्ट

लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल विजेता विजय कुमारही आज मायदेशी परतला आहे. 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात विजय कुमारने सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. आज दिल्ली विमानतळावर विजयचं आगमन झालं. यावेळी भारतीय आर्मीनं त्याचं जल्लोषात स्वागत केलं. लष्करातील त्याचे सिनिअर्स आणि सहकारी ऑलिम्पिक हिरोचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ऑलिम्पिक मेडल पटकावणारा विजय कुमार हा भारतीय लष्करातला दुसरा खेळाडू ठरला. याआधी कर्नल राज्यवर्धन सिंग राठोडनं अथेन्स ऑलिम्पिकमध्ये डबल ट्रॅप प्रकारात सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. विजय कुमारला लष्करातही बढती देण्यात आली.

close