आनंद परांजपेंना धक्का, दहीहंडीची परवानगी रद्द

August 8, 2012 3:30 PM0 commentsViews: 6

08 ऑगस्ट

डोंबिवलीतील शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. हायकोर्टाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने दिलेले सर्व निर्णय हायकोर्टाने रद्द केले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन कोणाला दहीहंडीसाठी परवानगी द्यावी याबाबत बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा असं हायकोर्टाने आयुक्तांनी सांगितलं. सर्व आयोजकांनी नव्याने अर्ज दाखल करण्याचे आदेश आता हायकोर्टाचे दिले आहे. आनंद परांजपे दरवर्षी भागशाळा मैदानावर दहीहंडी आयोजित आयोजित करत असतात या दहीहंडीला पालिकेने परवानगीही दिली होती. मात्र शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता. याप्रकरणी 24 जुलैच्या सर्वसाधारण सभेत युतीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला होता.

close