कैद्यांची ऐष, मिळतेय ‘होम डिलिव्हरी’

August 9, 2012 9:48 AM0 commentsViews: 3

09 ऑगस्ट

नाशिक रोडच्या सेंट्रल जेलमधल्या व्हीआयपी आरोपींना सीव्हील हॉस्पिटलमधला पाहुणाचार सुरूच आहे. सिव्हील हॉस्पिटलच्या आवारातला कैद्यांच्या वॉर्डमध्ये गंभीर आजार झालेल्या कैद्यांना उपचार सुरु असतो. पण प्रत्यक्षात हा वॉर्ड बनलाय श्रीमंत कैद्यांचे चोचले पुरवण्याची पळवाट.कैद्यांच्या घरचे डबे इथे येतात. विशेषत: मुंबईच्या गँगशी संबंधित आरोपी, राजकीय पक्षांशी लागेबंधे असलेले आरोपी आणि श्रीमंत आरोपी जेलऐवजी इथेच दिसतात. गेल्या 6 महिन्यात या कैदी वॉर्डचा पाहुणाचार घेतलेल्या आणि सध्या ऍडमिट असलेल्या काही वजनदार आरोपींचा यात समावेश आहे. यामध्ये छोटा राजन गँगशी संबंध असलेला अजित साटम, भुसावळची बिल्डर पण खुनाचा आरोप शिक्षा भोगणारी सानिया काद्रीचा समावेश आहे.

ह्या आरोपींना मिळता पाहुणचारअजित साटम – छोटा राजन गँगशी संबंधसानिया काद्री – भुसावळची बिल्डर , खुनाचा आरोप सय्यद काद्री- सानियाचे वडीलगणेश बनकर- खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोपरवीश जाजू- खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप, राजकीय वरहस्तविजय केदारे- छोटा राजन गँगशिरिष लवटे- खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप…सागर बेग-मंदार बोरकर – एमपीडीए (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध

close