बाबा रामदेवांचे तीन दिवस उपोषण

August 9, 2012 10:16 AM0 commentsViews: 3

09 ऑगस्ट

बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा रामलीला मैदानावर आंदोलन सुरु केलं आहे. काळा पैसा भारतात परत आणला जावा, सक्षम लोकपाल याच अधिवेशनात मंजूर केलं जावं या मागणीसाठी बाबा रामदेव यांनी आजपासून तीन दिवसांचं लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. लोकपालची लढाई संपलेली नाही तर आपण ती लढाई सुरू ठेवणार असल्याचं बाबा रामदेव यांनी सांगितलंय. तसेच आपलं आंदोलन कोणत्याही पक्षाविरुद्ध नसून व्यवस्थेविरुद्ध असल्याचं बाबा रामदेव यांनी स्पष्ट करत टीम अण्णांना टोला लगावला. तीन दिवस उपोषण केल्यानंतर आपण आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करु असंही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलंय. तसेच उद्यापासून संपूर्ण देशात सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

close