राज्यसभेत पहिल्याच भाषणात शिंदेंना मागावी लागली माफी

August 9, 2012 10:27 AM0 commentsViews: 6

09 ऑगस्ट

राज्यसभेत गृहमंत्री म्हणून पहिलंच भाषण देणार्‍या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना माफी मागावी लागली आहे. आसाम हिंसाचारावर, शिंदे उत्तर देत असताना खासदार जया बच्चन यांनी एक दोन वेळा आपला आक्षेप नोंदवला. तेव्हा ही अत्यंत गंभीर चर्चा आहे. फिल्मवर चर्चा सुरू नाही, असा टोमणा सुशीलकुमार शिंदेंनी जया बच्चन यांना मारला.आणि त्यावर जया बच्चन यांच्यासह सर्व विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ सुरु केला. अखेर सुशील कुमार शिंदेंना माफी मागत आपले शब्द मागे घ्यावे लागले.

close