विलासरावांच्या प्रकृतीत सुधारणा

August 9, 2012 10:44 AM0 commentsViews: 3

09 ऑगस्ट

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रकृतीत आज सुधारणा दिसतेय. ते औषधांना प्रतिसाद देत आहे. पसरत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. पण अजूनही विलासरावांचं ब्लडप्रेशन नॉर्मल होत नाहीये त्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर होण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती हॉस्पिटलच्या सुत्रांनी आयबीएन-लोकमतला दिली आहे. दरम्यान, विलासराव देशमुख यांचा मुलगा आमदार अमित देशमुख पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना विलासरावांच्या तब्येतीची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह तब्बल 15 नेत्यांनी चेन्नईत जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. विलासरावांवर ग्लोबल हॉस्पिटलच्या इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. विलासरावांना यकृताचा कॅन्सर असल्याचं थर्ड स्टेजमध्ये लक्षात आलंय. यकृत निकामी झाल्यामुळे किडन्यांवर गंभीर परिणाम झाला आहे.

विलासरावांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी राज्यभरात देवाला साकडं

विलासराव देशमुख यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी राज्यभरात देवाला साकडं घातलं जातंय. सर्वधर्मीय लोक विलासरावांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. मुंबईत सिद्धीविनायकाला खुद्द सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी साकडं घातलं. तर नाशिकमध्ये दर्ग्यामध्येही प्रार्थना केली जातेय. पुण्यातही अशाचप्रकारे देवाला साकडं घातलं जातंय.

close