टी-20 साठी टीमची घोषणा, युवराजचं कमबॅक

August 10, 2012 11:25 AM0 commentsViews: 11

10 ऑगस्ट

होय युवराज सिंग परतला आहे आपल्या टीममध्ये…गेल्या आठ महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला भारताचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलंय. श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणार्‍या टी-20 वर्ल्ड कप साठी आज 15 खेळाडूंच्या भारतीय टीमची निवड करण्यात आली. यात युवराज सिंगला स्थान देण्यात आलंय. नोव्हेंबर 2011 मध्ये युवराज सिंगला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि युवराज क्रिकेटपासून दूर गेला. पण अमेरिकेत उपचार घेत युवराजनं कॅन्सर मात केली आणि भारतीय टीममध्ये खेळण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. दरम्यान, भारतीय टीममध्ये स्पीन बॉलर हरभजन सिंगनंही पुनरागमन केलंय. 19 सप्टेंबरपासून श्रीलंकेत टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल.

भारताची टी-20 टीम

महेंद्रसिंग धोणी (कर्णधार),वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा, मनोज तिवारी, इरफान पठाण, आर अश्विन झहीर खान, एल बालाजी, पियुष चावला, हरभजन सिंग, अशोक दिंडा

न्यूझीलंड सिरीजसाठी सचिन आला परत

न्यूझीलंडविरुध्द होणार्‍या टेस्ट सीरिजसाठी आज भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. पुरेशा विश्रांतीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तर राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर त्याच्याजागेवर चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईकर अजिंक्य रहाणेलाही टेस्ट टीममध्ये संधी मिळाली आहे. सुरेश रैना आणि पियुष चावलानंही टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलंय. येत्या 23 ऑगस्टपासून भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हैदराबाद इथं पहिली टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. तर दुसरी टेस्ट मॅच बंगळुरुमध्ये रंगणार आहे.

भारताची टेस्ट टीम

महेंद्रसिंग धोणी, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, व्ही.व्ही.एस् लक्ष्मण, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, झहीर खान, उमेश यादव, प्रग्यान ओझा, पियुष चावला, ईशांत शर्मा