पुण्यात रस्त्यावर दहीहंडीला पोलिसांची परवानगी

August 10, 2012 11:40 AM0 commentsViews: 8

10 ऑगस्ट

पुण्यामध्ये बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांनी दहीहंडी आयोजकांना रस्त्यावर दहीहंडी साजरी न करता मोकळ्या मैदानात दहीहंडी साजरी करण्याचे आवाहन केले होते. पण या वादावरती आता सामंजस्याने तोडगा काढण्यात आला आहे. ज्या दहीहंडी आयोजकांना मोकळ्या मैदानात उत्सव साजरा करणे शक्य आहे ते मोकळ्या मैदानात उत्सव साजरा करणार आहेत. ज्या दहीहंडी आयोजकांना मोकळ्या मैदानात उत्सव साजरा करणे शक्य नाही ते आयोजक रस्त्यावरच दहीहंडी साजरी करणार आहे फक्त या उत्सवामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला कुठलाही अडथळा होता कामा नये याची हमी देण्याचे ठरले आहे.

close