लाईट गेल्याच्या तक्रारीवरुन वॉचमनने केला तरुणीचा खून

August 10, 2012 12:01 PM0 commentsViews: 27

10 ऑगस्ट

मुंबईतील वडाळा परिसरात पल्लवी पुरकायस्थ या व्यवसायाने वकील असलेल्या तरुणीचा हत्ये प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पल्लवी राहत असलेल्या बिल्डिंगचा वॉचमन पठाण याने आपण पल्लवीचा खून केल्याची कबुली दिली आहे. पल्लवीने आपल्या घरातील लाईट वारंवार जात असल्यामुळे रात्री वॉचमन पठाणला फोन केला होता. याच कारणावरुन पल्लवी आणि वॉचमन पठाणमध्ये बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात वॉचमनने पल्लवीचा खून केला. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पठाणला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरुन ताब्यात घेतले आहे. वडाळा परिसरातील भक्ती पार्कमधील हिमालयीन हाईट्स या इमारतीत काल पल्लवी पुरकायस्थ या 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. पल्लवी पुरकायस्थ ही आयएएस अधिकारी आणि कृषी खात्यात जॉईंट सेक्रटरी म्हणून अटानू पुरकायस्थ यांची मुलगी आहे.

close