विलासराव देशमुखांची प्रकृती स्थिर

August 10, 2012 12:25 PM0 commentsViews: 2

10 ऑगस्ट

केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रकृतीत स्थिर आहे. कालच्यापेक्षा कुठलाही फरक आज त्यांच्या प्रकृतीत पडलेला नाही. पण आज विलासराव औषधांना प्रतिसाद देत आहे. पसरत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. दरम्यान अशोक चव्हाण, नारायण राणे हे विलासरावांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी चेन्नईतल्या हॉस्पिटलमध्ये पोहचले आहे. गेल्या चार दिवसांपासून विलासरावांवर ग्लोबल हॉस्पिटलच्या इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना यकृताचा कॅन्सर असल्याचं थर्ड स्टेजमध्ये लक्षात आलंय. विलासरावांच्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी लातूरसह राज्यातील विविध भागात प्रार्थना करण्यात येत आहे.

close