कसाब-जुंदल येणार समोरासमोर, होणार एकत्र चौकशी

August 9, 2012 12:43 PM0 commentsViews: 3

09 ऑगस्ट

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दोन प्रमुख आरोपी अजमल कसाब आणि अबू जुंदल आता एकमेकांसमोर येणार आहेत. या दोघांना समोरासमोर आणून चौकशी करण्याची परवानगी राज्य सरकारने पोलिसांना दिली आहे. कसाब हा सध्या ऑर्थररोड जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. तर जुंदाल हा क्राईम ब्राँचच्या ताब्यात आहे. या दोंघाना समोरासमोर आणून चौकशी केली तर मोठा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांची चौकशी एकत्र करणार आहे. मागिल महिन्यात अबू जुंदल, जबिउद्दीन अन्सारी या नावाने ओळखला जाणार अतिरेकी पोलिसांच्या हाती लागला. जुंदलची चौकशी सुरु असताना त्यांनी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. जेव्हा 26/11 चा हल्ला झाला होता तेव्हा तो स्वत: पाकिस्तानमध्ये कंट्रोल रुममध्ये होता आणि अतिरेक्यांशी संपर्कात होता. आता समोरासमोर चौकशी होत असल्यामुळे दोघ जण काय जवाब देतात यासाठी पोलीस दोघांना एकत्र

close