26/11 हल्ला प्रकरणी अबू जुंदल देणार सोमवारी कबुली

August 10, 2012 1:53 PM0 commentsViews: 24

10 ऑगस्ट

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील महत्वाचा अतिरेकी अबू जुंदल याने कबुलीजबाब देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्याने आज महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला आहे. त्याचा अर्ज मंजूर झाला असून सोमवारी 13 ऑगस्टला त्याचा कबुली जबाब नोंदला जाणार आहे. कालच जुंदल आणि अजमल कसाब यांची एकत्र चौकशी करण्यात आली होती. यावेळी दोघांनीही एकमेकांना ओळखले आहे. मुंबई पोलिसांना जुंदलची कोठडी मिळल्यानंतर तपासाला वेग आला. यातूनच आज अजमल कसाब आणि अबू जुंदल आमनेसामने आले. या दोघांना समोरासमोर आणून चौकशी करण्याची परवानगी राज्य सरकारने पोलिसांना दिली होती. दोघांच्या भेटीनंतर जुंदलने कबुली देण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे. आता जुंदल काय कबुली देतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close