दहशतवादी हल्ल्याची जवाबदारी डेक्कन मुजाहिद्दीननं स्वीकारली

November 27, 2008 4:22 PM0 commentsViews: 5

27 नोव्हेंबर, मुंबई मुंबईतील निष्पाप लोकांवर केलेल्या क्रूर हल्ल्याची जबाबदारी डेक्कन मुजाहिद्दिननं या संघटनेनं स्वीकारली आहे. याहल्ल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आयबीएन- 7 ला ई-मेल पाठवला गेला. या ईमेलमध्ये मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या घातपाताची जबाबदारी डेक्कन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं उचललीय. या निमित्तानं एका नव्याच दहशतवादी संघटनेचं नाव समोर आलंय.देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा घातपात असा या घटनेचा उल्लेख केला जातोय.आणि यावेळी अगदी वेगळ्या पद्धतीनं दहशतवाद्यांनी आपली कारवाई फत्ते केली. या घातपाताची जवाबदारी डेक्कन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं घेतलीय. या नव्या दहशतवादी संघटनेच्या सहभागामुळे पोलिसच नाही तर गृप्तचर संस्थाही गोंधळून गेल्यात. कारण आजवर देशात झालेल्या घातपाती कारवायांमध्ये पहिल्यांदाच या संघटनेचं नाव समोर आलंय. याआधी लष्कर ए तोयबा, अल कायदा, जमाते इस्लामी, हिजबुल मुजाहिद्दीन अशा विविध दहशतवादी गटांचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं.मात्र आता पहिल्यांदाच डेक्कन मुजाहिद्दीनचं नाव उजेडात आलंय. खरं तर लष्कर ए तोयबा, अलकायदासारख्या दहशतवादी संघटना या एकाच गटासाठी काम करतात मात्र नवी कारवाई करताना या संघटना नवनवीन नावं ठेवतात. पोलिसांना तपासात अडथळा येण्यासाठी दहशतवाद्यांची ही ठरलेली पद्धती आहे. आता डेक्कन मुजाहिद्दीन ही संघटनाही लष्कर ए तोयबाचा एक भाग आहे. पाकिस्तानातील लाहोर, कराची आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये या संघटनेच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं बोललं जातंय. डेक्कनमध्ये नव्या दमाच्या तरुण जेहादींचा भरणा करण्यात आलाय. इंडियन मुजाहिद्दीनने सप्टेंबर 2008 मध्ये मुंबईत घातपात घडवण्याची धमकी दिली होती. आताची घटना ही त्याचाच एक भाग असल्याचं नाकारता येत नाही. ज्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर घातपाताची योजना आखून तो घडवून आणला, त्यामागे लष्कर ए तोयबा, इंडियन मुजाहिद्दीन याच संघटनेचा हात असल्याचा पोलिसांचा दाट संशय असून डेक्कन मुजाहिद्दीन हे नवं नाव असलं तरी त्यामागे इंडियन मुजाहिद्दीनंच असल्याचं बोललं जातंय.

close