कुस्तीपटूंना धक्का ;नरसिंग, अमितकुमारचा पराभव

August 10, 2012 3:14 PM0 commentsViews: 2

10 ऑगस्ट

भारतीय कुस्तीपटूंच्या मिशन ऑलिम्पिकला आज आणखी एक धक्का बसला आहे. भारताच्या अमित कुमारचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला आहे. 55 किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीत अमित कुमारने इराणच्या राहिमीचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. पण क्वार्टर फायनलमध्ये त्याला आपलं आव्हान कायम राखता आलं नाही. त्याच्यासमोर आव्हान होतं ते जॉर्जियाच्या ब्लादिमेरचं. पण ब्लादिमेरनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अमित कुमारवर मात केली. ही मॅच अमित कुमारनं 3-1 अश गमावली.

तर दुसरीकडे कुस्तीपटू नरसिंग यादवचे आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावणार्‍या नरसिंग यादवकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण या अपेक्षा त्याला पूर्ण करता आल्या नाही. 74 किलो वजनी गटात नरसिंग यादवला पहिल्याच फेरीत पराभव स्विकारावा लागला. कॅनडाच्या मॅथ्यू जेन्ट्रीनं त्याचा 3-1 असा पराभव केला. पहिल्याच फेरीत मॅथ्यूनं 3 पॉईंट घेत आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत 1-1 अशी बरोबरी झाली. पण पहिल्या फेरीतल्या आघाडीच्या जोरावर मॅथ्यू विजयी ठरला.

close