मुंबईत ताडदेव परिसरात एव्हरेस्ट टॉवरला आग

August 9, 2012 2:27 PM0 commentsViews: 2

09 ऑगस्ट

मुंबईतल्या ताडदेव परिसरात असलेल्या एव्हरेस्ट इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या नवव्या मजल्यावर असलेल्या ऑफिसला ही आग लागलीय. आगीची तीव्रता मोठी आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे आठ टँकर्स ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या इमारतीमध्ये अडकलेल्या सर्व 14 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. लवकरच ही आग आटोक्यात आणण्यात येईल, असं अग्निशमन दलानं म्हटलंय.

close