हॉटेल ओबेरॉयमध्ये अजूनही धुमश्चक्री सुरूच

November 27, 2008 7:33 PM0 commentsViews: 3

27 नोव्हेंबर मुंबईहॉटेल ताज तसेच हॉटेलओबेरॉयमध्येही अजून धुमश्चक्री सुरू आहे. 300 एनएसजी कमांडो आणि आर्मीचे अधिकारी ही कारवाई करत आहेत. हॉटेलमधून नव्यानं स्फोट झाल्याची बातमी आहे. हॉटेलमध्ये तूफान गोळीबारही सुरू आहे. ओबेरॉय हॉटेलमध्ये शेवटच्या टप्प्यातील कारवाईला सुरुवात झाली आहे.दरम्यान कमांडोजच्या कारवाईत ताज हॉटेलमधील 5 अतिरेकी मारले गेले आहेत.तसंच नरिमन हाऊसमधून 10 जणांची सुटका एनएसजीने केली आहे. त्यात 4 इस्रायली नागरिक आहेत.

close