पुण्यात दहीहंडी बंदीला भाजपचा विरोध

August 9, 2012 3:24 PM0 commentsViews: 1

09 ऑगस्ट

पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवरती रस्तांवर दहीहंडीचं आयोजन करु नये असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं.याला पुणे भाजपने विरोध केला आहे. भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकरी यांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेतली . अठ्ठेचाळीस तास आधी ही सुचना का दिली जातेय. पोलिसांचं हे तुघलकी फर्मान आहे आणि ते मानलं जाणार नाही असं त्यांनी आयुक्तांना सांगितलं दहशतवादी हल्ल्याची भीती काय फक्त पुण्यातच आहे का ? मुंबईमध्ये दहीहंडी रस्त्यांवरच पार पडते त्याला मंत्री देखील हजर राहतात. मग पुणे आणि मुंबईत वेगवेगळे नियम का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आपलं काम जमत नसल्यामुळेच पुणे पोलीस असे फर्मान काढत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

close