बाबा रामदेवांच्या उपोषणाचा आज शेवटचा दिवस

August 11, 2012 10:03 AM0 commentsViews: 5

11 ऑगस्ट

योगगुरु बाबा रामदेव यांच्या सांकेतिक उपोषणाचा आज शेवटचा दिवस आहे. रामलीला मैदानावर रामदेव बाबांचे हजारो समर्थक, गेल्या दोन दिवसांपासून जमलेत. परदेशी बँकेतून, काळा पैसा परत आणणे आणि जनलोकपालच्या मागणीसाठी रामदेव बाबांनी हे आंदोलन सुरु केलंय. पण रामदेव बाबांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय. त्यामुळे रामदेव बाबा आज काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close